जगातील एकमेव स्तंभरुपी शिवलिंग श्री हरिहर केशव गोविंद वेबसाईट वर आपले स्वागत आहे

Line

श्री हरिहर केशव गोविंद मंदिर प्रवरा नदीच्या काठी असलंले अतिशय पुरातन आणि जागृत देवस्थान आहे। हरी म्हणजे श्री विष्णु आणि हर म्हणजे शिव असे मानण्याचा प्रघात असला तरी या स्थानी हरिहर हे श्रीहरि विष्णुनी स्थापिलेल्या शिवलिंगाला संबोधले जाते। या स्थानाचा उल्लेख स्कंद पुराणात प्रवारा महात्म्य या अध्यायात दिसून येतो। पूर्वी या परिसराला बिल्वपुरी असे संबोधण्यात येत असे कारण या परिसरात घनदाट बिल्व म्हणजे बेलाच्या वन होते। सर्वत्र मोहक फुलांच्या वेली परिसरात सुशोभित करीत हवेत सुगंधाची मुक्त उधळण करीत आणि सर्वत्र मोर तसेच वनचर प्राणी विहार करीत असे। अशा या मनोहक परिसराकडे देवीदेवता सुद्धा आकर्षित झाले। एकदा शिवपार्वती पृथ्वी भ्रमणासाठी या परिसरात आले असता इथले निसर्गसौंदर्य पाहून पार्वती माता मोहित झाल्या। हा निसर्गाचा आनंद लुटत भ्रमण करीत असतांना पार्वतीमाता तहानेने व्याकूळ झाल्या, सर्वत्र शोध करुनही पाण्याचा एक थेंबही मिळेना, तेव्हा महादेवांनी एक बेलाचे पान तोडून जिमिनीवर टाकताच तेथे एक सुंदर सरोवर निर्माण झाले। या सरोवराचे पाणी पिलाल्याने पार्वतीमाता तृप्त झाल्या आणि या सरोवरात स्नान करणाऱ्यांना इच्छित संततीचा लाभ होईल व चारही पुरुषार्थ प्राप्त होतील असा वर देत या सरोवराला बिल्वतीर्थ असे नाव दिले।