• अभिषेक - धार्मिक विधी केले जातात, जसे की अभिषेक, ज्यामध्ये भक्तांना श्री हरिहर केशव गोविंद मंदिरातील पवित्र ठिकाणी जल, दूध, तूप, गुलाबजल इत्यादींचा अभिषेक करण्याची संधी मिळते. हे विधी पारंपरिक पद्धतीने व वंश परंपारंगत पद्धतीने सुरु आहेत, इतर भाविकांना अभिषेक करायचा असल्यास संस्थेशी संपर्क करावा, ठरलेल्या दिवशीची उपलब्धता असल्यास भाविंकाना संधी उपलब्ध होईल आणि गुरुंच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले जातील, ज्यामुळे भक्तांना आध्यात्मिक शांती आणि समाधान मिळते.
  • भक्तनिवास - भक्तनिवासमध्ये भक्तांची राहण्याची सोय केली जाते, जिथे स्वच्छ आणि आरामदायी खोल्या उपलब्ध असतात. हे निवासस्थान दूरून येणाऱ्या भक्तांच्या सोईसाठी निर्माण केलेले आहे, ज्यांना मंदिराच्या दर्शनासाठी किंवा सण-उत्सवांसाठी मुक्काम करायचा असतो. अल्पदरात निवास आणि वाहन सुविधाही उपलब्ध आहेत.
  • अन्नदान - देवस्थान ट्रस्टने अन्नदानाचा उपक्रम सुरू केला आहे, ज्याअंतर्गत दररोज गरजू आणि भक्तांना अल्पदरात प्रसादाची सोय केली जाते. हा उपक्रम मंदिराच्या सामाजिक सेवेचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये स्वच्छ आणि पौष्टिक अन्नाची व्यवस्था केली जाते.
  • कार्यक्रम -कथा, प्रवचन, विवाह, इतर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कार्यालय उपलब्ध करून दिले जाते. मंदिर परिसरात सुसज्ज हॉल आणि आवश्यक सुविधा प्रदान केल्या जातात, ज्यामुळे भक्तांना त्यांचे वैयक्तिक आणि सामुदायिक कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करता येतात. तांत्रिक सहाय्य आणि सजावट देखील उपलब्ध आहे.
  • रक्तदान - विशेष दिवशी विनामूल्य सेवा म्हणून रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात, ज्यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली रक्तदानाची सुविधा उपलब्ध आहे. हे शिबिरे समाजसेवेचा एक भाग म्हणून आयोजित केले जातात आणि रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि सन्मान देऊन प्रोत्साहन दिले जाते.
  • वैद्यकीय सेवा - अम्बुलन्सची विनामूल्य सेवा देवस्थान ट्रस्ट द्वारा दिली जाते, तसेच इतर मेडिकल सेवा पुरवल्या जातात जसे की प्राथमिक उपचार, मोफत औषधे वाटप, आणि वैद्यकीय तपासणी शिबिरे. हे सर्व भक्त आणि स्थानिकांसाठी उपलब्ध असून, आपत्कालीन परिस्थितीत मदत पुरवण्यासाठी ट्रस्ट कटिबद्ध आहे.